भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह. साखर कारखाना लि. सहयोग ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट नंबर १४ चंद्रभागानगर भाळवणी येथे मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम अत्यंत भक्तीमय, उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
यावेळी कारखाना साईटवर श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेची विधिवत पूजा करुन व कारखान्याचे संस्थापक कै. वसंतराव (दादा) काळे साहेब यांचे पुतळ्यास पुष्पहार घालून पूजा करण्यात आली.
यानंतर मिल रोलरची विधिवत पूजन करण्यात आली. यावेळी बोलताना गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये ५ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून त्यादृष्टीने कारखान्यातील मशिनरीची ऑफ सिझन मधील दुरुस्तीची कामे जलद गती चालु आहेत असे सागितले, तसेच यंदाच्या गळीत हंगामामध्ये अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतुकीचे करार करण्याचे काम चालू असून, आज अखेर 110 ट्रॅक्टर,185 बैलगाडी, 60 मिनी ट्रॅक्टर व 4 हार्वेस्टर याप्रमाणे करार करण्यात आलेले आहेत. आपले कारखान्याच्या बाबतीत पसरविण्यात येणाऱ्या भूलथापाना शेतकऱ्यांनी बळी न पडता आपला संपूर्ण ऊस या कारखान्यात गाळपास पाठविण्यात यावा असे आव्हान केले.
या प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन, भारत कोळेकर सर्व संचालक मंडळ, जनरल मॅनेजर आर आर साळुंखे , प्र. कार्यकारी संचालक पी डी घोगरे , चीफ इंजिनिअर बनकर , चीफ केमिस्ट पवार साहेब, मुख्य शेतकी अधिकारी देशमुख , चीफ अकाऊंटंट तंडे तसेच सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, सभासद व वाहन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरचा मिल रोलर पूजन कार्यक्रम अत्यंत आनंददायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.


