भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
उत्तर मुंबई धनगर समाज समिती मार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी विविध कार्यक्रमाने जयंती साजरी करण्यात येणार आहे, असे समितीचे अध्यक्ष संस्थापक निलेश मोटे यांनी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना सांगितले आहे.
सकाळी १० वाजता श्री रविशंकर शाळेसमोर प्रतिमा पूजन होईल, सायंकाळी ५ वाजता बोरिवली देवी पाडा ते कुलूपवाडी, रविशंकर शाळा अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, सायंकाळी ७ वाजता सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांसह , महाराष्ट्राची लोकपरंपरा श्री रविशंकर शाळेसमोर आयोजित करण्यात आला आहे.
या विभागातील धनगर समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन समिती व्दारा करण्यात आले आहे.मानवतावादी लोकहितवादी कार्य करणाऱ्या कुशल प्रशासक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त संपूर्ण भारत भर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती मोठ्या जल्लोषात, उत्साहात साजरी होत आहे.
कांदिवली विभागातील धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी जयंती उत्सवात समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.


