अकलूज प्रतिनिधी संजय निंबाळकर तेज न्यूज
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील BLA संदर्भातील महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे यांनी BLA संघटन बळकटीकरण, पक्षाची कार्यपद्धती आणि आगामी नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी संघटन वाढ, विकासकामांना गती, सर्वसामान्यांच्या अडचणी तत्परतेने सोडवणे आणि पक्ष विस्तारावर भर देण्यासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
माळशिरस पंचायत समितीचे नूतन सभापती दत्ता भैय्या मगर हे तालुक्यात करत असलेल्या विकासाभिमुख कामकाजाची विशेष दखल घेत उदय सामंत यांच्याकडून प्रशंसा करण्यात केली.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत साहेब, खासदार राहुल शेवाळे, खासदार ज्योतीताई वाघमारे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माढा लोकसभा प्रमुख चंद्रहार पाटील, सांगली जिल्हा प्रमुख संजय विभुते, जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे, दादासाहेब लवटे, जिल्हा प्रमुख आरती बसवंती, सतिश सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.


