मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
वृत्तपत्र लेखक हा जागल्याचे काम करत असतो, महाराष्ट्र राज्याचे आणि मराठी माणसांचे मूलभूत प्रश्न सातत्याने आपल्या लेखणीतून व निर्भीडपणे लिहून जनजागृतीचे काम करीत असतो, त्यातीलच गुरुनाथ तिरपणकर हे आहेत.गुरुनाथ तिरपणकर यांची पत्रकारितेतील सुरुवात ही पत्र लेखनानेच झाली आहे.
गेली३५वर्षे सामाजिक व पत्रकारिता, वृत्तपत्र लेखन क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या कार्याची दखल सुवर्ण महोत्सवी वर्षात कार्य करणाऱ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईने घेतली.नुकताच मधु शिरोडकर यांच्या कालप्रवाह या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते रवींद्र मालुसरे पुरस्कृत'निर्भीड जागल्या सन्मान पुरस्कार'समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
गुरुनाथ तिरपणकर हे जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून गेली सहा वर्षे कार्यरत आहेत.संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय उपक्रम राबवून जनजागृतीचे काम केले आहे.विविध सामाजिक संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.तसेच मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य मराठी मुक्त पत्रकार संघ, पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ अशा पत्रकार व वृत्तपत्र लेखक संघटनांवर कार्यरत आहेत.
गुरुनाथ तिरपणकर यांना"निर्भीड जागल्या सन्मान पुरस्काराने"सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.याप्रसंगी नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, माजी संपादक प्रकाश कुलकर्णी, साहित्यिक अशोक बेंडखळे, संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, माजी महापौर अरुण देव, संघाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच आमचे मुंबई चे प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर यांना"निर्भीड जागल्या सन्मान पुरस्काराने"सन्मानित केल्याबद्दल त्यांचे तेज न्यूज परिवारा तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा. उत्तम यश मिळावे हिच पांडुरंग चरणी प्रार्थना


