मुंबई प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
समाजासाठी एखादी गोष्ट चांगली असो वा वाईट हे दृष्टीस पडल्यानंतर वृत्तपत्र लेखक अधिक अस्वस्थ होतो.हातात लेखणी घेऊन ती घटना किंवा लोकांना भेडवसणारी समस्या तो लिहितो आणि एखाद्या दैनिकाकडे पाठवत नाही तोपर्यंत त्याला झोप येणार नाही,भले ते छापून येईल कि नाही याची पर्वा त्याला नसते.परंतु समाजातल्या जागल्याची भूमिका घेत आपण व्यक्त होऊ शकतो.याचे तुम्हाला समाधान असते.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ही संस्था महाराष्ट्रातील अशा हजारो जागल्यांना एकत्र करुन सातत्याने कार्यक्रम, उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या७५वर्षाहून अधिक काळ चळवळीच्या रुपात कार्यरत आहे.समाजाच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे आहे, असे उदगार पद्मश्री उदय देशपांडे यांनी काढले.मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे माजी अध्यक्ष जेष्ठ वृत्तपत्र लेखक मधू शिरोडकर यांच्या कालप्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच दादर येथे नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत आणि माजी संपादक प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
वृत्तपत्र लेखक आणि नवशक्ती जमका सदर यांचे ऋणानुबंध प्रभाकर यांच्या काळापासून गेली७५वर्षे आहेत.दररोज सर्वाधिक पत्रे नवशक्तीकडे येतात हे नाते जपण्यासाठी त्यांना आमच्याकडून पूर्ण पानभर प्रसिद्धी दिली जाते.यापुढच्या काळात वृत्तपत्र लेखकांकडून अभ्यासपूर्ण परंतु परखडपणे लिहावे अशीही आमची इच्छा आहे असे आवाहन नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत यांनी सांगितले.मधू शिरोडकर यांचे पत्रलेखक आणि वृत्तपत्र लेखक संघासाठी कीती महत्त्वाचे आहे याचे विवेचन नवशक्तीचे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी यांनी केले.वाचकांची मते किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट करताना जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये संपादकीय पानावर अनेक सुप्रसिद्ध लोकांनी केले आहे, चर्चिल आणि आणि ब्रिटिश साहित्यिकांचे दाखल त्यांना यावेळी दिले.
जेष्ठ साहित्यिक अशोक बेंडखळे यांनी संस्थेचा पत्रवृत्तांत लिहिताना संस्थेची वाटचाल आणि इतिहास कसा प्रगल्भ आहे हे सांगितले.मधू शिरोडकर यांनी५०वर्षापूर्वीची संघाची वाटचाल आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या आठवणी सांगितल्या.यावेळी माजी उप महापौर अरुण देव, संघाचे माजी अध्यक्ष विजय कदम, माजी प्रमुख कार्यवाह विश्वनाथ पंडित, नंदकुमार रोपळेकर आणि दत्ताराम घुगे यांचीही भाषणे झाली.संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रम प्रमुख दिगंबर चव्हाण यांनी सुत्रसंचलन आणि माजी अध्यक्ष मनोहर साळवी यांनी आभार प्रदर्शन केले.महाराष्ट्र राज्य आणि मराठी माणसांचे मूलभूत प्रश्न सातत्याने सेवाभावीवृत्तीने व निर्भीडपणे आपल्या लेखणीतून सातत्याने पदरमोड करुन जनजागृती हे जे काम करीत आहेत.
अशा वृत्तपत्र लेखकांना१)ग.शं.सामंत स्मृती"निर्भीड जागल्या सन्मान पुरस्कार"विश्वनाथ पंडित२) विजय ना कदम पुरस्कृत'निर्भीड जागल्या'पुरस्कार अरुण खटावकर३) रवींद्र मालुसरे पुरस्कृत'निर्भीड जागल्या'पुरस्कार गुरुनाथ तिरपणकर४) दिलीप ल.सावंत पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार लीना वालावलकर५) रमेश सांगळे पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार श्रीनिवास डोंगरे६) ॲड.मनमोहन चोणकर पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार संजय साळगावकर७)आबास आतार पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार सूर्यकांत भोसले८) मधुकर कुबल पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार राजन देसाई९) चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार नितीन कदम१०) कृष्णा काजरोळकर पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार दत्ता खंदारे११)सतिश भोसले पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार शिरीष बने१२) आत्माराम गायकवाड पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार कमलाकर जाधव१३)पास्कल लोबो पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार भाऊ सावंत१४)मनोहर साळवी पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार अनंत दाभोळकर१५) प्रशांत घाडीगांवकर पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार रामचंद्र जयस्वाल१६) दिलीप दळवी पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार पंकज पाटील१७) दिगंबर चव्हाण पुरस्कृत निर्भीड जागल्या पुरस्कार दीपक गुंडये या पत्रलेखकांचा संघाच्या वतीने"निर्भीड जागल्या"पुरस्कार प्रदान करुन यावेळी सन्मानित करण्यात आले.
तर पत्रस्पर्धेतील यशस्वी ठरलेल्या विजय ना कदम,मधुकर कुबल,नीशा शेरे, रामचंद्र मेस्त्री,प्रा.जयवंत पाटील यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

