फलटण प्रतिनिधी तेज न्यूज
फलटण तालुक्यातील ताथवडे या गावामध्ये डसऱ्याक रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांचे तर्फे कै. ॲड. धोंडीराम अर्जुना खरात (निवृत्त प्राचार्य) यांच्या ६ व्या पुण्यतिथीनिमित्त व ७६ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आठ दिवसांचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम वन विभागाच्या क्षेत्रामध्ये शेकडो वृक्षांचे रोपण व बीज रोपण करून साजरा करण्यात आला.
त्यावेळी संस्थेचे डायरेक्टर ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात आणि डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात व वन विभागाचे वनरक्षक सुरज इंकर, वनसेवक गजाबा जाधव व संस्थेचे वॉलंटियर राजाराम अडसूळ, सुखदेव फुले, पंकज शिंदे, सनी नाळे,श्रीकांत गावडे, अशोक गावडे, वीरसेन सोनवणे आणि हिम्मतराव खरात तसेच ताथवडे गावचे जाधव, शिंदे आणि इतर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.


