भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम प्रतिनिधी तेज न्यूज
मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार कवी लेखक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांच्या " शृंगारिक लावण्या" या लावणी संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
७ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वाई येथील रमेश गरवारे सभागृह, लोकमान्य टिळक ग्रंथालय, वाई, जिल्हा सातारा या ठिकाणी मिरग नक्षत्र साहित्य संमेलनात भारत कवितके यांच्या शृंगारिक लावण्या या लावणी संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे के.एस.आय.प्रकाशन, महाराष्ट्र राज्य,विद्या निकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या ५ व्या मिरग नक्षत्र साहित्य संमेलनात भारत कवितके यांच्या दहाव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.असे साहित्य संमेलनाचे इंगळी सरकार अर्थात विलास पाटील यांनी कळविले आहे.
स्त्री मनाच्या भाव भावनांचा आविष्कार असलेल्या लावणी या प्रकाराकडे साहित्यात पाहिजे तेवढे प्राधान्य दिले गेले नसल्याचे जाणवते आहे, भारत कवितके यांनी फक्त लावण्या चा एक संग्रह काढण्याचे धाडस केले आहे.साहित्य क्षेत्रात खूप कमी लावणी संग्रह प्रकाशित झाले आहेत.या लावणी संग्रहात कवी भारत कवितके यांनी स्त्री शृंगाराचे अतिशय बारकाईने पैलू लिहून साहित्य क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटविला आहे.या अगोदर भारत कवितके यांची ९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
सर्वच पुस्तकांना अनेक राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत, इष्कात रात रंगली, भामटा, टिचकी,नार तोऱ्यात चाले, उकाड्याने जीव हैराण झाला, गालात हसतोय, कशाला बघताय राव, थंडीची लावणी, धक्यावर धक्का,हा उकाडा सोसवेना, विरहाची लावणी, वगैरे वगैरे सारख्या लाडीक,रसिल्या, स्त्री शृंगाराच्या जवळ जवळ ५० लावण्याचा हा लावणी संग्रह रसिकांच्या, वाचकांच्या भेटीला लवकरच येत आहे,
साहित्य क्षेत्रात या शृंगारिक लावण्या लावणी संग्रहाचे जोरदार स्वागत होईल यात शंका नाही.सध्या भारत कवितके अनेक लावण्या युट्यूबवर प्रसारित होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहेत, रसिकांच्या पसंतीला उतरल्या आहेत.


