भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
ओंकार साखर कारखाना उद्योग समूह हा राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त भाव देणारा उद्योग समूह असून आज रोजी या उद्योग समूहाद्वारे १७ कारखाने यशस्वीरित्या चालवले जात आहेत. तसेच या उद्योग समूहाच्या विश्वासार्हतेमुळे कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश मध्ये देखील या उद्योग समूहाद्वारे कारखाने चालवले जात आहेत. यावर्षी जवळपास ७५ लाख मे. टन ऊस गाळप करण्यात आले असून, येणाऱ्या गळीत हंगामामध्ये १ कोटी मे. टन ऊस गाळप करण्याचा मानस आहे. ओंकार उद्योग समूहाची घोडदौड महाराष्ट्र राज्य व देशात सुरू झालेली आहे.
या उद्योग समूहाकडे हजारो ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रक इ. वाहने, २.१५ लाख टोळी चालक कामगार व ट्रॅक्टर-ट्रक ड्रायव्हर व मुकादम / ठेकेदार, ८ लाख शेतकरी एवढी मोठी संख्या असून. महाराष्ट्र राज्यातील अडचणीत असणारे, अनेक वर्ष बंद पडलेले साखर कारखाने यशस्वीरित्या चालवून काटकसरीने नियोजन करत व उत्तम प्रशासन चालवत मा. बाबूराव बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वात आज पर्यंत सर्वात जास्त दर व तोडणी वाहतूकदार यांना वेळेत पेमेंट देण्यात आलेले आहे.
मात्र मागील काही दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक ओंकार उद्योग समूह व मा. बाबुराव बोत्रे पाटील यांना बदनाम करण्यासाठी काही व्यक्ती व समूहाद्वारे सार्वजनिक बदनामी करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. २ हजार कोटी, ३ हजार कोटी रुपये थकवण्यात आलेले आहेत. अशी खोटी माहिती वितरीत करण्यात येत आहे. या वर्षी राज्यात १४० खाजगी / सहकारी साखर कारखाने यांनी गळीत हंगाम चालविला असून १५ जानेवारी २०२६ नंतरची २१०० कोटी रुपये एवढी रक्कम राज्यातील १४० साखर कारखाने यांचेकडे प्रलंबित आहे. ओंकार उद्योग समूहाच्या माध्यमातून चालवल्या जात असलेल्या १७ कारखाने यांचेकडून आज रोजी १८३० कोटी रुपये एवढे पेमेंट अदा करण्यात आले असून, वाहतूकदार यांना ७१० कोटी रुपये देण्यात आले आहेत. यावर्षीच्या गळीत हंगाम अखेर ओंकार उद्योग
समूहाचा ६ हजार कोटी रुपयांचा टर्नओव्हर झाला असून पुढच्या वर्षी किमान ७ हजार कोटी रुपये एवढा टर्न ओव्हर होणार आहे. मात्र काही दिवसा पासून.... संदर्भात ऊस बिलाबाबत काही समाज विघातक घटकांकडून जाणीवपूर्वक खोट्या, दिशाभूल करणाऱ्या व बदनामीकारक अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून कारखान्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे हि बाब अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे.
जाणीव पूर्वक दिशा भूल करणे व शेतकरी, वाहतूकदार, कामगार यांच्यामध्ये अफवा पसरवून समाजामध्ये ओंकार उद्योग समुहाची बदनामी करणाऱ्या काही सामाजकंटकावर मागील दोन दिवसात राज्यभर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी, वाहतूकदार, कामगार व संबंधित सर्व घटकांना आवाहन करतो की, आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीसाठी थेट कारखान्याशी संपर्क साधावा. असे आवाहन ओंकार समूहाच्या वतीने ओमराजे बोत्रे पाटील यांनी केले आहे.
रविराज साबळे पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची दिशाभूल करणारी माहिती देऊन ओंकार उद्योग समूहाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यावर लवकरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती ओमराजे बोत्रे पाटील यांनी दिली.
केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार पेट्रोल डिझेल मध्ये ३३% इथेनॉल मिक्स करण्याचे नवीन धोरण आल्यामुळे यावर्षीचे इथेनॉल व मोलॅसिस अजून पर्यंत विक्री केलेले नाही. त्याचे जवळपास ६०० कोटी रुपये ओंकार उद्योग समूहाला येणे आहेत.
त्यामुळे फक्त महिनाभर ऊसाचे पेमेंट देणे उशीर झाला आहे. मात्र पुढील आठवड्यात शेतकरी, वाहतूकदार यांचे एकही रुपये शिल्लक राहणार नसून. ओंकार उद्योग समूहाच्या माध्यमातून देशभरात २२ कारखाने चालवले जाणार असून या गळीत हंगामात १ कोटी मे. टन ऊस गाळप करण्यात येईल, अशी माहिती ओमराजे बोत्रे पाटील यांनी दिली.
बंद पडलेले साखर कारखाने चालू करून सामान्य शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाचा अधिकचा मोबदला कसा जास्तीत जास्त देता येईल याची काळजी घेणारा माणूस म्हणजे बाबुराव बोत्रे पाटील.
त्यामुळे कोणत्याही राजकीय कारखानदारा बरोबर न जाता स्वतः शेतकऱ्याचे हित कसे जोपासले जाईल याचा विचार करणारा कारखानदारीतील देव माणूस बाबुराव बोत्रे पाटील यांची बदनामी करून संधी साधू कारखानदार पुढाऱ्यांनी चालू केलेली बदनामी तात्काळ थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल...
शेतकरी संतोष मासाळ


