पणजी प्रतिनिधी तेज न्यूज
गोवा पणजी येथे पार पडलेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात मुंबईतील विकास सामाजिक कार्यकर्ते व सी. एस. क्रिएटिव सोल्यूशन्स चे संस्थापक श्री विकास ज्ञानू देशमुख यांना “राष्ट्रीय महागौरव पुरस्कार २०२६ गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.गोवा कला अकादमीच्या शानदार सभागृहात हा सोहळा पार पडला. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा राष्ट्रीय सन्मान करण्यात आला.
झोपडपट्टीतून “मुंबईतील 7×8 खोलीतून सुरू झालेला विकास देशमुख यांच्या कार्याचा प्रवास राष्ट्रीय स्तरावर पोहोचला.
या सोहळ्यास व अधिवेशनास अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष व गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळ देसाई, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे, किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, डिजिटल मिडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने
तसेच विविध राज्यांतील आमदार आणि देशभरातील हजारो डिजिटल मीडिया पत्रकार उपस्थित होते.
*७ बाय ८च्या खोलीतून सुरू झालेला प्रवास…*
|“Slum to National Award: भारताच्या आरोग्य व्यवस्थेत ग्राउंड लेव्हलवर बदल घडवणारी कहाणी”
मुंबईतील एका झोपडपट्टीतील ७ बाय ८च्या खोलीत वाढलेला हा तरुण जीवनात वेगळ्या मार्गावर जाऊ शकला असता… परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांमुळे त्यांनी समाजसेवेचा मार्ग निवडला. विद्यार्थी चळवळीतून नेतृत्व करताना त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले, आंदोलनं केली आणि यानंतर त्यांनी आयुष्य पूर्णपणे समाजासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
*KEM हॉस्पिटलमध्ये निःस्वार्थ सेवा*
*मुंबईच्या तरुणाचा देशभर प्रभाव”*
विकास देशमुख यांनी केईएम रुग्णालयात कोणतेही मानधन न घेता १ वर्षे शासकीय योजनांवर पूर्णवेळ प्रचारक काम करताना त्यांनी प्रणालीतील अडथळे ओळखले आणि एक नवीन “Hospital-End Govt health Scheme End to End Implementation Model” विकसित केला.
याच मॉडेलमुळे आज देशभरातील लाखो रुग्णांना त्यांचा “उपचाराचा हक्क” मिळतो आहे.
*एक मॉडेल… लाखो जीवांना दिलासा*
आरोग्य क्षेत्रातील शांत क्रांतीला राष्ट्रीय सन्मान”||
विकास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ने:
६६,७०,०००+ रुग्णांना लाभ
₹ ३५,०००+ कोटी क्लेम सेटलमेंट
९९.८० % क्लेम यश दर (दुर्मीळ विक्रम)
१२+ राज्यांमध्ये सेवा विस्तार
२४×७×३६५×१३ वर्षे हॉस्पिटल च्या बाजूने योजना रुग्णालयांमध्ये राबवण्यासाठी अखंड सपोर्ट सिस्टम
*आरोग्यदूत — टेक्नॉलॉजी आधारित प्लॅटफॉर्म*
१५० पेक्षा अधिक आरोग्य शिबिरे,सावली केअर सेंटर (रुग्ण निवास भोजन सेवा प्रकल्पाचे संचालन),लाखों आयुष्मान भारत कार्ड यांचे घर पोहोच वाटप.
विविध सामाजिक संस्था आणि ट्रस्ट यांच्या समन्वयातून रुग्णांना कोट्यावधी अर्थसाहाय्य
शेकडो लहान बालकांच्या गुंतागुंतीच्या रुदय शस्त्रक्रिया
शेकडो किडनी, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून घेण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिली
त्यांच्या कार्यामुळे “योजना = हक्क” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.
*मुंबई महानगरपालिकेत ऐतिहासिक विक्रम*
मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच, सर्व मनपा रुग्णालयांमध्ये एका वित्तीय वर्षात ₹ १०० कोटींहून अधिक क्लेम सेटलमेंट यशस्वीरीत्या साध्य करण्यात आले. या माध्यमातून हजारो रुग्णांना शासकीय आरोग्य योजनांद्वारे पूर्णतः मोफत वैद्यकीय उपचार मिळाले. विशेष म्हणजे, या सर्व प्रकरणांमध्ये १०० % यशदराने क्लेम मंजुरी व सेटलमेंट करण्यात आले असून, हा एक ऐतिहासिक व अभूतपूर्व विक्रम ठरला आहे. या विक्रमात्मक कामगिरीत श्री विकास देशमुख यांचा मोलाचा व निर्णायक वाटा आहे.
*कोविड काळात रणांगणात उतरलेले नेतृत्व..*
कोरोना महामारीच्या काळात धारावी, नेहरूनगर सहित ९ झोपडपट्ट्यांमध्ये कोविड संसर्ग रुग्ण शोध, उपचार, जनजागृती आणि हॉस्पिटल समन्वय यामध्ये रा. स्व. संघाच्या अभियानाचे त्यांनी एक स्वयंसेवक या नात्याने नेतृत्व करत निर्णायक भूमिका बजावली. या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते “ COVID Warrior Award ” ने सन्मानित करण्यात आले...
विकास देशमुख यांची
विचारधारा — सेवा, समर्पण आणि राष्ट्रभावना
“देशात कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये” हा त्यांचा एकमेव ध्यास आहे. ते म्हणतात:“शासकीय योजना हे दान नाही — तो प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.”
आयोजकांची प्रतिक्रिया - “दान नव्हे, हक्क! — लाखो रुग्णांना उपचार मिळवून देणाऱ्या कार्याला राष्ट्रीय सन्मान”
“विकास देशमुख यांचे कार्य हे केवळ व्यवस्थापन नसून ते समाजसेवेचा जिवंत आदर्श आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आरोग्य व्यवस्थेतील निस्वार्थ कार्याचा गौरव आहे.


