पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
बारावी परीक्षेचा निकाल आज (2 मे) जाहीर करण्यात आला. राज्यात (12th Result Maharashtra Board) पुणे विभागाचा निकाल 93. 34 टक्के लागला असून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. बारावी निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना 7 वेगवेगळ्या वेबसाईटवर आपला निकाल पाहता येणार आहे.
यावर्षी राज्याचा एकूण निकाल 91.87 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या 93.29 च्या तुलनेत यात 1.42 टक्क्यांची घट झाली आहे. मुली मुलांपेक्षा 5.59 टक्क्यांनी जास्त उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व नऊ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभाग 97.51 टक्के निकालासह प्रथम क्रमांकावर आहे. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.
◼️ *नऊ विभागीय मंडळाचा निकाल*
पुणे 91.25
नागपूर 88.67
छत्रपती संभाजीनगर 88.68
कोल्हापूर 89.97
अमरावती 90.92
नाशिक 90.72
लातूर 84.14
कोकण 94.14
मुंबई 90.08
◼️ *शाखानिहाय निकाल*
विज्ञान शाखा: 96.44 टक्के
वाणिज्य शाखा: 92.71 टक्के
कला शाखा: 86.45 टक्के
व्यावसायिक अभ्यासक्रम (HSC Vocational): 87.75 टक्के
◼️ *निकालाची ठळक वैशिष्ट्ये*
1. डिजिटल क्रांती: यावर्षी प्रथमच गुणपत्रिका (Marksheet) आणि प्रमाणपत्र (Certificate) निकाल लागल्यापासून 15 व्या दिवशी एकाच वेळी शाळांमध्ये उपलब्ध करून दिली जातील.
2. सुरक्षा उपाय: पेपर वाहतुकीसाठी GPS एनेबल डिजिटल लॉक सिस्टिमचा यशस्वी वापर करण्यात आला.
३. कॉपीमुक्त अभियान: कडक निर्बंधांमुळे यावर्षी निकालात काही प्रमाणात घट झाली आहे. परीक्षेदरम्यान 1983 गैरप्रकार आढळले असून 100 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
4. सवलतीचे गुण: खेळाडू, NCC, स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
5. पुरवणी परीक्षा: जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी जून-जुलै 2026 मध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाईल.

