पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज 6 मे 2026 रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जेसीबी च्या साह्याने मोठा खड्डा करून पंचांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण 3 लाख रुपये किमतीची देशी-विदेशी बनावटीची दारू व बियर वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकूण 107 गुन्ह्यातील जप्त दारू पंढरपूर तालुका पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने खड्डा करून संपूर्ण जेसीबीच्या साह्याने फोडून नष्ट केली.
सदरची दारू पोलीस स्टेशनला अनेक दिवसापासून जप्त होती त्याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी संबंधित विभागाला पाठपुरावा करून आज रोजी एकूण 3 लाख रुपयांची देशी-विदेशी दारू व बियर नष्ट केलेली आहे एकूण 107 दारूच्या गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करून मुद्देमालाची निर्गती करण्यात आलेली आहे
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे महिला पोलीस हेडक्वार्टेबल मनेरी,पोलीस कॉन्स्टेबल देशमुख पोलीस पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ कॉन्स्टेबल सुजित उबाळे महिला पोलिस हवालदार कदम यांच्या पथकाने केली


