पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज दि. 8 मे 2026 रोजी राज्यभरातील इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. पंढरपुरातील अरिहंत पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे. अरिहंत पब्लिक स्कूलची 100% निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे. इयत्ता दहावीच्या लागलेल्या निकालामध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित अरिहंत पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
पंढरपुरातील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित अरिहंत पब्लिक स्कूल शाळेचा निकाल 100% लागला असून इयत्ता दहावीची परीक्षा देत असलेल्या 51 विद्यार्थ्यांनी 75 % पेक्षा अधिक गुण संपादन केले आहेत. एकूण आठ विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.
यामध्ये चि. प्रज्वल प्रकाश जाधव या विद्यार्थ्याने 93:00 % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर कुमारी ईश्वरी विठ्ठल पवार हिने 92.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर रुद्राक्ष राकेश परदेशी या विद्यार्थ्याने 92.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादित केला आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. शितल शहा, सचिव श्री उज्वल दोशी, खजिनदार श्री मिलिंद शहा, सीबीएसई विभागाच्या प्रमुख सौ. सुप्रिया बहिरट, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मा लोखंडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


