श्री.स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवाचे सहावे पुष्प (प्रथम सत्र) फुलले श्रध्दा शिंदे व सहनृत्यांगनांच्या भक्तीमय कथ्थक नृत्याविष्काराने.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमीत्ताने येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजीत दि.३ एप्रिल ते दि.१४ एप्रिल अखेर संपन्न होत असलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील सहाव्या पुष्प मालेतील प्रथम सत्र आज मुंबईच्या नुपूर स्कूल ऑफ कथ्थकच्या संस्थापिका व कथ्थक नर्तिका श्रध्दा शिंदे व सहनृत्यांगनांच्या भक्तीमय कथ्थक नृत्याविष्काराने गुंफण्यात आले.
या कथ्थक नृत्यात मुंबईच्या श्रध्दा शिंदे व शिष्या तथा सहनृत्यांगना कविता सोनार, स्पृहा ललीत, शिवानी देशमुख, सान्वी गुप्ता यांनी विविध कथ्थक नृत्याविष्कार सादर करीत गणेश स्तुती, नटराज स्तुती, स्वामींचे भजन, कान्हारे, दुर्गा स्तुती इत्यादी भक्ती प्रकारांवर कथ्थक मधील गिनती, तत्कार, आमद, चक्रदार इत्यादी विविध प्रकारच्या कथ्थक नृत्यांनी आपली कथ्थक नृत्यसेवा श्री स्वामी समर्थाच्या चरणी अर्पण करताना उपस्थित भाविकांच्या टाळ्यांची वाहवा मिळविली.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी सर्व कलाकारांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. या कार्यक्रमात साऊंड सिस्टीमवर प्रकाश कासेगांवकर यांनी उत्तम साथसंगत केली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.ओंकार पाठक यांनी केले.
या प्रसंगी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे,शरण मठाचे विश्वस्त बसवराज आलमद, सुरेश भोसले , प्रसाद पाटील ,अशोक उटगे, रमेश शिंदे , डॉ.मल्लीनाथ बोधले , अमर पाटील, अंकूश केत, बाळासाहेब एकबोटे, दिपक जरिपटके, बाळासाहेब कुलकर्णी, श्रीशैल गवंडी, मनोज जाधव, सागर गोंडाळ, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे, दर्शन घाटगे, अक्षय सरदेशमुख, स्वामीनाथ लोणारी, संजय पाठक, प्रा.शिवशरण अचलेर,प्रा.नागनाथ जेऊरे, ऋषिकेश लोणारी, तुषार मोरे, तन्मय इचगे, महेश मस्कले यांच्यासह असंख्य स्वामीभक्त व देवस्थानचे कर्मचारी व सेवेकऱ्यांनी उपस्थित राहून या सेवेचा लाभ घेतला.

