संभाजीनगर प्रतिनिधी तेज न्यूज
कोणताही पात्र लाभार्थी अन्नसुरक्षेपासून योजनेपासून वंचित राहणार नाही - राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष. महेश ढवळे
अनेक वर्षापासून अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित असणारा शिधापत्रिका नसलेले कुटुंब भिलार समाज वनवासी यांना 55 कुटुंबांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका व 76 कुटुंबाला प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका कन्नड तालुक्यात राज्य अन्न आयोगाच्या सूचनेवरून राज्य अन्न आयोग अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.
राज्य अन्न आयोगाचा मार्च महिन्यात संभाजी नगर येथे हा दौरा होता त्या प्रसंगी या समाजात भेट देण्यात आली होती. या अनुषंगाने मार्च महिन्यात यांना शिधापत्रिका देण्याच्या सुद्धा कार्यक्रम पार पडला.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संभाजीनगर, संघ परिवारातील सर्जेरावजी वाघ, प्राध्यापक अशोक गिरी यांची उपस्थिती होती.

