पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे,यांनी समाजमाध्यमांवर प्रसिध्द केलेला निर्भया पथकाचा वॉटसॲप नंबर ९११२२२६३५२ यावर क्यु.आर. कोड स्कॅन करुन गोपनिय बातमीदारादवारे मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर ग्रामीण हद्दीत एक बालविवाह दोन दिवसाने होत असल्याचे गोपनिय बातमी मिळाल्याने निर्भया पथक पंढरपूर यांनी सदर ठिकाणी तात्काळ जावुन चौकशी केली.
सुरुवातीला मुलीचे नातेवाईकांनी मुलगी १७ वर्षाचे असल्याचे मान्य केले, मात्र पोलीस पथकाने अधिक खोलवर चौकशी करुन ती शिकत असलेल्या शाळेतुन तिचे बोनाफाईड प्रमाणपत्र घवून आले असता तिचे वय हे १५ वर्षे ११ महीने दिसुन आले. छापलेल्या लग्नपत्रिका या निर्भया पथकानें ताब्यात घेतल्या व त्यानंतर तो होणारा विवाह तिचे आई वडीलांना समज देवुन रोखण्यात आलेला आहे.
सदर अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती, सोलापूर यांचेसमक्ष पुढील कार्यवाहीकरीता हजर करण्यात आले.
तसेच निर्भया पथक, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण तसेच करकंब पोलीस ठाणे हद्दीतील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, आपले हद्दीमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास पोलीस स्टेशन व निर्भया पथकास संपर्क करावा व यापुढे कोणी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करेल अशा लोकांवर प्रचलित कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल. तसेच अशा लोकांची गय केली जाणार नाही असेही सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर , सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया यादव ,पोकॉ वाघमारे, पोकॉ सावंत, पोकॉ कुचेकर, पोकॉ टिंगरे, पोकॉ काझी यांनी पार पाडलेली आहे.

