पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
ऊसतोडणीसाठी सहकार शिरोमणी साखर कारखान्याने ऊस तोडणी व वाहतुकीसाठी जानेवारी २०२५ मध्ये सांगली जिल्ह्यातील जत येथील वाहन व वाहतुक टोळी यांचेबरोबर एक कोटी दोन लाखांचा करार केला होता.
सदर कराराची रक्कम यातील प्रत्येकाला चेकद्वारे अदा केली होती. परंतु या मुख्य सुत्रधार असलेल्या चार जणांनी एकमेकांशी संगनमत करून कारखान्याशी करार करून सदर रक्कम हडप केली व कारखान्याची फसवणूक केल्याचे कालांतराने निदर्शनास आले. कारण संबंधितांनी ऊसतोड व वाहतुकीसाठी करारानुसार काम न केल्याने कारखान्याची ऊस तोड व ऊस वाहतूक झाली नाही. परिणामी कारखान्याचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
यानौतर कारखान्याचे वतीने दिनांक २७-१-२०२५ रोजी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्यात अशोक बबन येळे , सुरेश गोफणे, बाबु ओलेकर, ज्ञानेश्वर तांबे सर्व रा. करेवाडी, ता. जत, जिल्हा सांगली, सुखदेव कोकरे रा. मोटेवाडी, ता. जत या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु यानंतर हे आरोपी १ वर्ष तीन महिने फरार होते. यानंतर पंंढरपूर न्यायालयाने या आरोपींना फरार घोषीत केले. पुढे जत ची पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि यातील मुख्य म्होरक्या असलेल्या ज्ञानेश्वर द्रोपदा तांबे, रा . करेवाडी, ता.जत,जि. सांगली याला अटक केली असून न्यायालयाने सदर आरोपीस १४ दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावली आहे.
न्यायालयाने सदर आरोपीला पोलीस कोठडी सुनावलृयानंतर चौकशीत सदर आरोपीने ट्रॅक्टर चे बनावट नंबर देऊन, बोगस आधार कार्ड वापरून व बोगस करारपत्रं करुन कारखान्याकडून चेक द्वारे रक्कम घेतली, पण यंत्रणा मात्रं कारखान्याकडे लावली नाही. असे निष्पन्न झाले. यानंतर आज दिनांक २४ एप्रिल रोजी सदर आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असुन त्याची रवानगी सोलापूर च्या जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.
याप्रकरणी फिर्यादी प्रतापराव थोरात यांना कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कारखान्याचे वतीने न्यायालयीन कामकाज ॲड. राजेश भादुले यांनी पाहिले.

