भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने डिजिटल मीडिया तील उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार प्रशांत माळवदे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार व छायाचित्रकार जैनुद्दीन मुलानी यांच्या हस्ते शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे,ग्राम. पंचायत सदस्य सविता संभाजी शिंदे व पत्रकार आनंद देशपांडे उपस्थित होते.
यावेळी संभाजी शिंदे म्हणाले की ग्रामीण भागातील सर्वात फास्ट बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. आज पर्यंत दहा हजार पेक्षा जास्त बातम्या या डिजिटलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. याचीच दखल घेऊन पंढरपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने माळवदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी अनेक पुरस्काराने पत्रकार प्रशांत माळवदे यांना गौरवण्यात आले आहे त्यांच्या पुढील कारकीर्द शुभेच्छा असे शिंदे म्हणाले.
यावेळी जैनुद्दीन मुलानी म्हणाले की भाळवणी परिसरातील पहिले डिजिटल पोर्टल तेज न्यूज आहे .या डिजिटलच्या माध्यमातून अनेक बातम्याना प्रसिद्ध दिली जात आहे. माळवदे यांची पत्रकारिता सर्वसामान्य असल्यामुळे अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या पुढील कार्याची खूप खूप शुभेच्छा असे मुलांनी म्हणाले.
यावेळी आनंद देशपांडे म्हणाले की तेज न्यूजच्या माध्यमातून अनेक बातम्याना प्रसिद्धी दिली जात आहे. अनेक दुर्लक्षित बातम्या या डिजिटल माध्यमातून प्रसिद्ध देऊन ग्रामीण भागातील यशस्वी कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रसिद्ध दिली जात आहे हे मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
यावेळी प्रशांत माळवदे यांनी आभार मानले.

