पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
धोंडेवाडी तालुका पंढरपूर येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांची नामवंत कंपनीमध्ये निवड झाली आहे.
ताई किशया इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कॅम्पस घेण्यात आले.
कंपनीचे एच. आर मॅनेजर रवींद्र करवंदे, प्राडक्शन इंजिनियर अमर गोडसे, वेल्डर कोआडीनटेर उमाकात मलपे यांनी थेट मुलाखत द्वारे वेल्डर 05, फिटर 13, इलेक्ट्रिशन 07 या ट्रेड मधील प्रश्नार्थ्यांची यांची निवड केली आहे. विद्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे, उपाध्यक्ष बाळासाहेब काळे, प्राचार्य संतोष गुळवे यानी केले. अनिल ननवरे , श्रीरंग आठवले , गणेश लिंगे या निदेशकाचे मार्गदर्शन लाभले.

