भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख पदी पुनश्च एकदा संभाजी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल पत्रकार व छायाचित्रकार जैनुद्दीन मुलानी यांच्या हस्ते शाल ,पुष्पगुच्छ, हार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार आनंद देशपांडे , पत्रकार प्रशांत माळवदे हे उपस्थित होते.
यावेळी संभाजी शिंदे म्हणाले की जैनुद्दीन मुलानी यांच्या पत्रकारतेमुळेच माझ्या राजकीय कारकीर्दस सुरुवात झाली. मला व माझ्या कार्याची दखल घेऊन त्यास मोठी प्रसिद्धी दिली. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याची व काम करण्याची संधी मिळाली. तसेच जैनुद्दीन मुलानी यांनी पत्रकारिता करीत असताना 5 वेळा देहू ते पंढरपूर पायी वारी केल्याचे उदाहरण हे अभिमानाचे असल्याचे सांगितले.यापुढेही जैनुद्दीन मुलानी यांचे कार्य वाढत राहो. हीच पांडुरंग चरणी प्रार्थना असेही शिंदे म्हणाले.
त्यावेळी जैनुद्दीन मुलानी म्हणाले की संभाजीराजे यांचे कार्य निपक्षपणी निस्वार्थी असल्यामुळेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्य पदी काम करण्याची संधी मिळाली ही साक्षात विठ्ठलाची कृपा आहे. संभाजी राजे यांचे कार्य हे कौतुकास्पद असून शिवसेना पक्षाने या कार्याची दखल घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख पदी परत एकदा निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.
यावेळी जुन्या गोष्टींना उजाळा देत पत्रकार आनंद देशपांडे यांनी आभार मानले.

