ठाणे प्रतिनिधी तेज न्यूज
तेजस्वी फाऊंडेशन आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कविता डॉट कॉम” या संकलित काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथील वा. अ. रेगे सभागृहात उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका, कवयित्री व वक्त्या पूर्णिमा शिंदे उपस्थित होत्या. तसेच लेखक-कवी बाबुराव शिंदे आणि अभिनेते, लेखक व कवी श्रीप्रकाश सप्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून अशा उपक्रमांमुळे साहित्याची जपणूक होते तसेच नवोदित कवींना प्रोत्साहन मिळते, असे नमूद केले.
“कविता डॉट कॉम” या काव्यसंग्रहाचे संपादन प्रा. प्रज्ञा मनिष पंडित व प्रा. डॉ. संतोष राणे यांनी केले असून, या पुस्तकाचे प्रकाशन अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
राजीव प्रधान, एकनाथ शेडगे, वर्षा गायकवाड, विजय चव्हाण, विजया थिगळे, नितीन सावे, डॉ. सुवर्णा नारखेडे, अमोल निरगुडे, वर्षा भावे, नंदा कोकाटे, संजना जुवाटकर, अंकिता टोणगे, प्रकाश पालांडे, भाग्यश्री पालये, वर्षा थोटे, स्वाती पारखी, स्वप्नाली कुलकर्णी, रोहिणी जितकर आणि मधुरा जोशी यांच्या वाचनीय कवितांचा या काव्यसंग्रहात समावेश आहे.या पुस्तकाच्या मुद्रित लेखनाची जबाबदारी शुभांगी गडकरी यांनी समर्थपणे पार पाडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिजिटल गुरु मनिष पंडित यांनी केले. कार्यक्रमास साहित्यप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली होती. आयोजकांनी केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

