म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते व शिंपी समाज सातारा जिल्हाध्यक्ष इंजि.सुनील पोरे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त 50 किलोमीटर सायकलिंग करून अभिवादन केले
सालाबादप्रमाणे याही वर्षी गत 12 वर्षांपासून म्हसवड येथील शुभम भारत गॅस ऍजन्सीचे सर्वेसर्वा सामाजिक कार्यकर्ते इंजि.पोरे हे दरवर्षी 14 एप्रिल गोंदवले बुद्रुक 10 डिसेंबर शिखर शिंगणापूर श्रावणातील पहिल्या आठवड्यात पंढरपूर येथे सायकल चालवण्याचा छंद जोपासला आहे.
या ही वर्षी त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त मंगळवार दि.14 रोजी सकाळी 5 वाजता घरापासून सायकलिंग सुरू करून 6:30 वाजता दिड तासात गोंदवले येथे पोहचुन तेथील जयभीम युवक ऑर्गनायझेशन आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून महामहामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले
व नंतर पुन्हा सकाळी 7 वाजता गोंदवले ते म्हसवड 8:30 वाजता सव्वातासात म्हसवडला पोहोचले पोरे यांच्या या 50 किलोमीटर सायकल चालवून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याच्या उपक्रमाचे बौद्ध बांधवांनी कौतुक केले आहे.

