सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान महावीर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त पोलीस बॉईज असोसिएशन वतीने महिलांसाठी मोफत बीपी, शुगर, एच बी. तपासणी शिबीर आयोजित केले होते.
जुळे सोलापूर येथे डॉ. वर्षा पगारे यांच्या सम्यक क्लिनिक येथे आरोग्य शिबीर राबविण्यात आले. डॉ वर्षा पगारे, डॉ निलोफर शेख, डॉ. संस्कृती वळसंगकर यांनी महिलांची तपासणी केली.
प्रथम प्रमुख पाहुणे शुभांगी शिवाजी झेंडे- कुलकर्णी, शुभांगी चेतन शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबीराचे उदघाटन करण्यात आले.
डॉ वर्षा पगारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधान घटना बद्दल माहिती दिली. त्यांच्या महान कार्यामुळे आज प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदस्थ आहेत. आणि 50 शी नंतर महिलांमध्ये मेनोपॉज मुळे बदल होतो, त्यामुळे चिडचिड,नैराश्य येते. त्यासाठी समतोल आहार, व्यायाम, आनंदीत राहणे, आपले छंद जोपासणे, नाहीतर टेन्शन येऊन डीप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता असते. या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. निलोफर शेख यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात नियमित जाऊन आपल्या आरोग्याची तपासणी करावी. असे आवाहन केले.
जिल्हा अध्यक्ष संध्या काळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महान कार्यामुळे आज प्रत्येक स्त्री शिकून आपल्या पायावर सक्षम उभी आहे. आणि म्हणाले आज मी जे काही आहे मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुळे आहे.
प्रमुख पाहुणे यांनी भगवान महावीर यांच्या " अहिंसा परमो धर्म " अहिंसा बद्दल माहिती दिली. उन्हाळ्यात प्रत्येकांनी मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची सोय करा आपल्या घराबाहेर, गच्चीवर, बाल्कनीत पिण्याची सोय करा असे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे शुभांगी झेंडे- कुलकर्णी. यांनी या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान महावीर, व महात्मा ज्योतिबा फुले यांचे आभार मानून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
हा पोलीस बॉईज असोसिएशन प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अध्यक्ष संध्या काळे व प्रमिला तूपलवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा कार्यध्यक्ष क्षितिजा गाताडे, जिल्हा अध्यक्ष संध्या काळे, शहर अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना शाल बुके देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे कार्यक्रम प्रमुख डॉ. वर्षा पगारे यांच्या सहकार्याने मुळे हा कार्यक्रम संपन्न झाल्यामुळे नमिता थिटे यांच्या हस्ते डॉ वर्षा पगारे यांचा शाल बुके देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे आभार सचिवा शारदा मसुती यांनी मानले.
या कार्यक्रमास शुभांगी शहा, शुभांगी झेंडे- कुलकर्णी, नमिता थिटे, संध्या काळे, क्षितिजा गाताडे, प्रमिला तूपलवंडे, शोभा बोबे, राजश्री तडकासे, ऍड मानसी कुलकर्णी, ऍड सारिका अग्निहोत्री-, वर्षा अतनूरे, निर्मोही अग्निहोत्री-, मयुरी शहा, बाई शहा, आयेशा शेख, सुप्रिया कुलकर्णी, अष्टपुत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.60 महिलांनी या शिबीराचे लाभ घेतला.

