पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरपूर शहरातील विविध भागातील नागरी समस्या तसेच नियमाप्रमाणे नसलेल्या गतिरोधकाबाबत व त्यावर कॅट आईज पांढरे पट्टी मारण्यात यावेत याबाबतचे लेखी निवेदन नगराध्यक्षा व मुख्य अधिकारी पंढरपूर नगरपरिषद यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने देण्यात आले.
ज्या भागात गतिरोधक अर्थात स्पीड बेकर आहे या स्पीड बेकर वरचे पांढरे पट्टे हे पुसट झाले असून अचानकपणे लाईट गेल्यास वहान धारकास हे स्पीड बिकर अंधारात लवकर लक्षात येत नसल्याने गतिरोधकावर गाडी आढळून काही जण पडल्याच्या घटना घडल्या आहेत याकरता या स्पीड बेकर वर कॅट ऑइल व पट्टे मारण्यात यावेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याचवेळी शहरातील विविध समस्या त्या रस्त्याच्या अतिक्रमणांच्या असो मोकाट कुत्र्याचा प्रश्न असो अगर उघड्यावर मास कटाई चा असो याबाबत उपाययोजना कराव्यात याबाबतचे ही निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे सचिव महेश भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सरगम चौक रस्ता जीवघेणा झालेला आहे गुडघ्या एवढे खड्डे रस्त्यावर पडलेले असून जड वाहतूक तिथून सुरू आहे स्त्रिया महिला मुली वयस्कर यांच्यासाठी धोकादायक आहे
यावेळी मुख्याधिकारी यांचे बरोबर नागरी समस्या बाबत चर्चा होऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत वतीने नागरी समस्या बाबत जी निवेदने देण्यात येतात त्याची दखल घेतली जात नाही असेही यावेळी मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले की यापुढे ग्राहक पंचायतीकडून व त्यांच्या पदाधिकाऱ्याकडून आलेल्या सूचनाचा योग्य तो विचार करून त्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
नगर पालिकेस वारंवार अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने सूचना व निवेदन देऊन ही संबंधित प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विनंती केली जात आहे परंतु नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर,प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेच्या कार्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

