संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
माळशिरस तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील ३९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.शंकरनगरच्या स्मृती भवनात पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने सन २०२५-२६ च्या अंतर्गत ७ व शिक्षण विस्ताराधिकारी १, मुख्याध्यापक सहशिक्षक ३१ असे एकूण ३९ जणांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार उत्तम जानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी सभापती दत्ता मगर,उपसभापती मनीषा पाटील,जि.प. सदस्य गौतम माने,नागन्नाथ भोसले,सुषमा नारनवर,मीनाक्षी सरतापे,लीलावती ठवरे,पं.स.सदस्य प्रवीण वाघमोडे, युवराज झंजे,आनंद शेंडगे,महादेव साबळे,आप्पासाहेब पाटील,मनीषा नाईकनवरे,नम्रता पुकळे,रेश्मा माने, स्नेहा जानकर,माजी सभापती मच्छिंद्र ठवरे,मिलिंद सरतापे, गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी यांनी माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३९१ शाळा आहेत.२८ हजार ६५ विद्यार्थी शिक्षण घेतात, तर १ हजार ११७ शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत असल्याचे सांगितले.
*या शिक्षकांचा झाला सन्मान सोहळा*
अस्लम इनामदार (विस्तार आधिकारी),सिद्धेश्वर भरते (केंद्रप्रमुख),भारत मगर,संभाजी फुले,बाळू शिंदे,युन्नूस तांबोळी, दत्तात्रय पराडे,मधुकर वनसाळे (मुख्याध्यापक),शीतल जाधव, सुरेश शिंदे,दिलीप उकिरडे,भारतीय गवळी,सुरेखा काळे,राजश्री जाधव, रमेश सरक,अर्जुन पिसे,आनंद गोंदलवाड,पद्मिनी मारकड,लक्ष्मण भिंगे,अंकुश कोळी,अर्चना कामेगावकर,सुहास उरवणे,धनाजी जाधव,विष्णू जायभाय,दिपाली तापोळे,प्रभाकर कटकदोंड,विजय हेगडे,अयुब काझी,नागनाथ वाघमोडे,वर्षाराणी हेगडे,संगीता पोरे,रुक्मिणी पारसे,जहाँगीर मुलाणी,दत्तात्रय चव्हाण,अमोल सोपनर,नवनाथ क्षीरसागर,किरण गाडगे,संतोष चौगुले,विनोद चंदनशिवे (सहशिक्षक).
यावेळी आदर्श शिक्षकांच्या वतीने किरण घाडगे, अर्जुन पिसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास उरवणे,राजाराम गुजर, नितीन बनकर यांनी केले, तर गटविस्तार अधिकारी असलम इनामदार यांनी आभार मानले.
शिक्षक म्हणजे गुणवत्तेची खाण आहे.त्यांचे भाषेवर प्रभुत्व असते. त्यांच्यातील उपजत ज्ञान आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम करते म्हणून शिक्षकांनी अंतर्मनातील ज्ञानाचा झरा वाहू देऊन नव तंत्रज्ञानयुक शिक्षणाने विद्यार्थी घडवावेत.
उत्तम जानकर
आमदार माळशिरस

