सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
गुरु विदया प्रतिष्ठान,पोलीस बॉईज असोसिएशन,हरि प्रिया ब्राह्मण महिला सामाजिक मंचच्या वतीने "श्रेयस क्लिनिक" येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती निमित्त अभिवादन करून सर्व रोग निदान शिबीर आयोजित केले होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक व उपमहापौर डॉ नसिमा पठाण-काळे. प्रमुख पाहुणे नूतन नगरसेवक रूद्रेशजी बोरामणी,गुरु विदया प्रतिष्ठानचे संस्थापक सोमशेखर भोगडेसर, हरि प्रिया अध्यक्ष क्षितिजा गाताडे व सचिवा प्रांजली हिंगे, शहर उपाध्यक्ष राजश्री तडकासे ऍड अनुराधा येगडे, पोलीस बॉईज असोसिएशन डॉकटर आघाडीचे डॉ संस्कृती वळसंगकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सर्व रोग निदान शिबीराचे उदघाटन करण्यात आले. पोलीस बॉईज असोसिएशन प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. डॉ नसिमा पठाण-काळे मॅडमचा व नूतन नगरसेवक रूद्रेशजी बोरामणी यांचा सत्कार शाल व नॅपकिन बुके देऊन सोमशेखर भोगडेसर यांच्या हस्ते करण्यात आले.
परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती निमित्त आदर्श दंपती म्हणून श्री व सौ. वसंत व वैशाली वळसंगकर यांचा आदर्श दंपती म्हणून शाल व नॅपकिन बुके देऊन डॉ नसिमा पठाण-काळे. मॅडमच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सिध्देश्वर यात्रेचे मानकरी विजय भोगडे अप्पा यांना तसेच आदर्श गायक पुरस्कार मिळाल्या बद्दल व श्रेयस क्लिनिकचे डॉ श्रेयस वळसंगकर व संस्कृती वळसंगकर यांचा शाल व नॅपकिन बुके देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांनी केले.
तसेच सूत्रसंचलन ऍड मानसी कुलकर्णी यांनी केले आभार प्रदर्शन प्रांजली हिंगे यांनी केले. पाहुण्यांची ओळख ऍड अनुराधा येगडे यांनी करून दिले.
नूतन नगरसेवक यांनी पोलीस बॉईज असोसिएशनला, गुरु विदया प्रतिष्ठानला व हरि प्रिया ब्राह्मण महिला सामाजिक मंच यांनी संयुक्त विद्यमाने परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती निमित्त सर्व रोग निदान शिबीर राबवून सामाजिक कार्य करून समाजापुढे आदर्श ठेवलात, व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ नसिमा पठाण-काळे. मॅडमना संपूर्ण भगवद्गीता पाठ असून सर्व संताच्या चरित्राचे गाढे अभ्यासक आहेत. दोन्ही महान सत्पुरुषांच्या महान कार्याविषयी माहिती दिली. तसेच 3 ही संघटनेच्या कार्याचा कौतुक केले.
या सर्व रोग निदान शिबीरात 154 पेशंटनी शिबीराचे लाभ घेतला. डॉ श्रेयस वळसंगकर व संस्कृती वळसंगकर यांनी पेशंटची तपासणी केली
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रांजली हिंगे, क्षितिजा गाताडे, ऍड मानसी कुलकर्णी, ऍड अनुराधा येगडे, राजश्री पाटील, सोमशेखर भोगडे , विजय भोगडे आप्पा, डॉ संस्कृती वळसंगकर, नमिता थिटे, आदी पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमची सांगता गायक प्रा. अनिल लोंढे यांनी या जन्मावर या मरणावर शतदा प्रेम करावे या गाण्यानी सांगता झाली.

