भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम
मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना साहित्य रत्न विकासरत्न प्रेरणा पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात आले.
रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ अक्षय तृतीया रोजी सकाळी ११वाजता कांदिवली पूर्व येथील अशोक सावंत सभागृहात समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट व्दारा भारत कवितके यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राज्य स्तरीय साहित्य रत्न विकास रत्न प्रेरणा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले,सांज, शोधतो मी किनारा, आकाश तारकांचे,अरे मी एकटा,मी एक वृत्तपत्र लेखक, माझ्या गावाच्या दिशेने.., मनातल्या चारोळ्या,चांदण्याना रोज सांगतो, अशी आता पर्यंत ९ पुस्तके भारत कवितके यांची प्रकाशित झाली आहेत, इष्कात रात रंगली हा लावणी संग्रह लवकर प्रकाशित होणार आहे,१६ गाणी युट्यूबवर प्रसारित होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहेत.
पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते म्हणून भारत कवितके यांना आता पर्यंत ११६८ पुरस्कार मिळाले आहेत, महाराष्ट्र राज्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये सातत्याने बातम्या लेख कविता कथा चारोळ्या प्रसिद्ध होत असतात, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश दिल्ली या ठिकाणाहून विविध पुरस्कार मिळाले आहेत.
या प्रसंगी संस्थेच्या मिनाक्षी पाखरे, उद्घाटक अलका नाईक, अशोक मोहिते, रामकृष्ण कोळवणकर, रावसाहेब घोडेराव, मंगेश नाईक, संगीता वानखेडे, आदी मान्यवर उपस्थित होते,तर रसरसीत, मनोरंजनात्मक, काव्यात्मक सूत्रसंचालन संदीप रासकर यांनी केले, या पुरस्कारामुळे भारत कवितके यांचेवर अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
तसेच तेज न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

