पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दशावतारा मधील एक भगवान नृसिंह अवतार मानला जातो. खर्डी येथील कुलकर्णी(केसकर)वाडा हिल्लाळ पार,कुंभार गल्ली येथे असणाऱ्या स्वयंभू नृसिंह मंदिरात सकाळी पवमान अभिषेक करण्यात आला.दुपारी चार ते सहा पर्यंत भजनाचा कार्यक्रम झाला.सायंकाळी ज्यावेळी सूर्य आणि चंद्र एकाच वेळी पावणे सात वाजता पुष्प वर्षाव करण्यात आला.
पौराणिक संबंध
"सुर्यास्तावेळी एकाच वेळी आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य तेजस्वी दिसणारी तिथी म्हणजे वैशाख शुद्ध चतुर्दशी वेळी नृसिंह खांबातून प्रकट झाले होते. ढगाळ वातावरण नसेल तर आपणही उघड्या डोळ्यांनी दिवस मावळताना पाहू शकता हा विलक्षण योग पाहू शकतो."
यावेळी हरिभाऊ कुलकर्णी, बापू केसकर,नंदू काका,दत्तात्रय हिलाळ,अशोक हिलाळ, खंडू कुंभार,भिकाजी कुंभार आदींनी परिश्रम घेतले.हिलाळ पार येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावात सर्वत्र भक्तिमय वातावरणात नृसिंह जयंती साजरी करण्यात आली.

