नियोजीत मुरलीधर मंदीर भक्त निवास बांधकामाची पाहणी केल्यानंतर समाधान पुर्वक भावोद्गार व्यक्त करताना ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे मनोगत.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित गाणगापूर रोडवरील देवस्थानचं भक्त निवास हा सर्व भाविकांच्या पसंतीच्या निवास व्यवस्थेचेउत्तम उदाहरण आहे.
दररोज हजारो भाविक स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात आणि या भक्तांच्या सेवेसाठी मंदिर समितीचे प्रमुख महेश इंगळे व विश्वस्त पदाधिकाऱ्यांनी सेवाभाव जोपासत गेल्या २६ वर्षापासून नाममात्र देणगी भाडे आकारून भक्त निवास भाविकांच्या सेवेत उपलब्ध करुन दिले आहे. कालांतराने भाविकांच्या मागण्याप्रमाणे येथे वातानुकूलित खोल्यांची ही निर्मिती झाली आणि त्याचा लाभ सध्या भाविक घेत आहेत.
आता श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीने देवस्थानच्या मुरलीधर मंदिर परिसरातील जागेत नियोजित भक्तनिवास बांधकाम हाती घेतले आहे. त्याचे बांधकाम सध्या प्रगती पथावर असल्याचे पाहून समाधान झाले, म्हणून स्वामी भक्तांसाठी नियोजित मुरलीधर मंदिर भक्तनिवास सोयीचेच होईल असे मनोगत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदीर समितीच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मुरलीधर मंदिर येथील नियोजित भक्त निवासाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर बोलत होते. पुढे बोलताना ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी गाणगापूर रोडवरील
भक्त निवासामध्ये सुसज्ज खोल्या, वातानुकूलित खोल्या डॉर्मिटरीज (सामूहिक खोल्या), पिण्याचे पाणी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. याच पार्श्वभूमीवर यापेक्षाही उत्तम दर्जाची सुविधा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती व समितीचे प्रमुख महेश इंगळे हे मुरलीधर मंदिर भक्तनिवास येथे देण्यास समर्थ आहेत.
अशा प्रकारचे मनोगत व्यक्त करून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या या उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी प्रशांत गुरव, ह.भ.प.आबा महाराज कुरनूरकर, प्रा.शिवशरण अचलेर, सागर गोंडाळ, धनराज स्वामी, रमेश शिंदे, तुषार मोरे, आदिसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

