पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता (Arrhythmia) आता पंढरपुरातच पूर्णपणे बरी होऊ शकते! पंढरपूर विभागातील एकमेव इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्टसह प्रगत हृदय उपचार केंद्र - पंढरपूर येथील काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये आता अत्याधुनिक ईपी लॅब (EP Lab) कार्यान्वित करण्यात आले आहे.
याविषयी डॉ. बसवराज सुतार म्हणाले की,आम्हाला कळवताना आनंद होत आहे की, आमच्याकडे आता अत्याधुनिक ईपी लॅब (EP Lab) आणि सर्व इलेक्ट्रोफिजिओलॉजी प्रक्रिया उपलब्ध आहेत. यामध्ये आम्ही रुग्णांना पुढील सेवा उपलब्ध करून देणार आहोत.
✅ इलेक्ट्रोफिजिओलॉजी (Electrophysiology) म्हणजे काय?
जेव्हा हृदयाचे ठोके खूप जलद, खूप मंद किंवा अनियमित होतात, तेव्हा त्यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि त्यावर कायमस्वरूपी उपचार करण्यासाठी ‘ईपी स्टडी’ आणि ‘अॅब्लेशन’ केले जाते.
🏥 उपलब्ध अत्याधुनिक उपचार आणि प्रक्रिया:
🔹 EP Study (ईपी स्टडी): हृदयाच्या विद्युत वहन संस्थेची तपासणी.
🔹 Radiofrequency Ablation (RFA): हृदयाच्या अनियमित ठोक्यांवर कायमस्वरूपी उपचार.
🔹 Pacemaker Implantation: हृदयाचे ठोके कमी असल्यास पेसमेकर बसवणे.
🔹 ICD & CRT Implantation: हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि अचानक हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी प्रगत उपकरणे.
🔹 3D Mapping: गुंतागुंतीच्या हृदयविकारांचे अचूक निदान. केले जाणार आहे.अशी माहिती कार्डिओलॉजिस्ट व इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट डॉ. बसवराज सुतार यांनी तेज न्यूजला दिली.


