अक्कलकोटमध्ये श्रीराम नवमी निमीत्त जय्यत तयारी - ऋषिकेश लोणारी
श्रीराम प्रतिष्ठान व श्रीराम जन्मोन्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन.
अक्कलकोट प्रतिनिधी तेज न्यूज
श्रीराम नवमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख उत्सव आहे. गुढीपाडव्या रोजी चैत्राची सोनेरी पहाट उगवताच प्रत्येक हिंदूला वेध लागतात ते श्रीराम नवमीचे. जो प्रभू श्रीरामांच्या जन्मदिनाच्या रूपात भारतात सर्वत्र साजरा केला जातो. याच श्रीराम नवमी निमीत्त प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्त ऋषिकेश लोणारी यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात दरवर्षी प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची स्थापना करीत अक्कलकोट शहरामध्ये मध्ये श्रीराम नवमी उत्साहात साजरा करण्याची परंपरा निर्मीत केली.
दरवर्षी श्रीराम नवमी निमीत्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन व गतवर्षी तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रभू श्रीरामांच्या मुर्तीचे वाटप करून श्रीराम नवमी उत्सवाचा तालुक्यात प्रचार व प्रसार कार्य जोमाने करीत तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे म्हणून श्रीराम प्रतिष्ठान व श्रीराम नवमीच्या माध्यमातून संस्थापक ऋषिकेश लोणारी यांचे प्रभू श्रीरामांच्या भक्तीचे प्रचार, प्रसार करण्याचे कार्य तरुणांना आदर्शवत असल्याचे मनोगत येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांनी केले.
आज श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव निमीत्त करण्यात आलेल्या तयारी बद्दल पत्रकार परिषदेच्या वतीने आढावा घेण्यात आला. यावेळी शहरातील श्रीराम नवमी उत्सव निमीत्त माहिती देताना प्रथमेश इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना प्रथमेश इंगळे यांनी श्रीराम नवमी हा दिवस आपल्याला सत्य, धर्म आणि नैतिकतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतो. प्रभू श्रीरामांचे जीवन आपणा सर्वांना सत्य, न्याय आणि मर्यादेचे महत्व शिकविते, म्हणून आज आपण सर्वांनी श्रीराम नवमीचे महत्व समजून घेत सर्वांनी प्रभू श्रीरामांच्या चरणी श्रध्देय भक्तीभावाने नतमस्तक होण्याचे आवाहनही केले.
यावेळी श्रीराम प्रतिष्ठान व श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या श्रीराम नवमी उत्सवानिमीत्त माहिती देताना श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषिकेश लोणारी म्हणाले की अक्कलकोट मधील श्रीराम नवमी उत्सव हा गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यामध्ये लक्षवेधक ठरत आहे. सालाबादा प्रमाणे यंदाही श्रीराम नवमी निमीत्त जय्यत तयारी करण्यात आली आहे.
श्रीराम नवमी दिवशी प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची स्थापना, मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची महाआरती, पारंपारीक भजन, दिंडी व वाद्यांसह शहरातून भव्य शोभायात्रा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या भव्य दिव्य श्रीराम नवमी उत्सवात व शोभायात्रेत सहभागी होवून उत्सवाची व शोभायात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन ऋषिकेश लोणारी यांनी नागरीकांना केले आहे.

