शिर्डी प्रतिनिधी तेज न्यूज
श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी विलास सोपान कोते, शिर्डी यांनी श्री साईबाबांच्या चरणी सुमारे ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे देशी जातीचे ७० पोते हरभरे अर्पण केले. या हरभऱ्यांचा उपयोग संस्थानच्या श्री साईप्रसादालयात भाविकांना प्रसादरूपाने देण्यात येणाऱ्या भोजनातील भाजीसाठी करण्यात येणार आहे.
तसेच पुणतांबा येथील साईभक्त विलासराव दुरगुडे यांनी २ लाख ९९ हजार ९९९ रुपये किंमतीचे अपोलो एंड्युरंस कंपनीचे १६ नग टायर संस्थानकडे देणगी स्वरूपात सुपुर्द केले आहे. या टायरचा उपयोग श्री साईबाबा संस्थान ट्रस्टकडे उपलब्ध असलेल्या वाहनांसाठी करण्यात येणार आहे.
या देणगीनंतर संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी दोन्ही देणगीदार साईभक्तांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले.


