भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत घेण्यात आलेल्या सुगम संगीत स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी ता. पंढरपूर जि. सोलापूर या विद्यालयाचे घवघवीत यश मिळाले आहे.
इयत्ता पाचवी ते सातवी या गटामध्ये इयत्ता सहावी ब मधील विद्यार्थिनी प्रांजल संदीप पवार हिचा मध्य विभागामध्ये पाचवा क्रमांक आला.या स्पर्धेमध्ये विद्यालयातील एकूण चार विद्यार्थी सहभागी झाले होते.
सहभागी झालेले विद्यार्थी माने वैष्णवी रामदास इयत्ता पाचवी अ, पवार प्रांजल संदीप इयत्ता सहावी ब, शेख सिमरन अझरुद्दीन इयत्ता नववी अ, भोसले समर्थ अर्जुन आठवी ब या चारही विद्यार्थ्यांनी जिजामाता अध्यापक विद्यालय,सातारा .या ठिकाणी उत्कृष्ट असे सादरीकरण केले. त्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख लिंगे एस .एच. सहाय्यक शिक्षिका नागणे एम. एस. व धोत्रे पी .डी.यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता सहावी मधील विद्यार्थी रोहित केंजळे याने तबल्याची साथ दिली तसेच समर्थ भोसले याने पखवाजाची साथ दिली पालक रामदास माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व टाळाची साथ दिली.
वरील सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील , सहसचिव माध्यमिक विभाग पवार बी एन , विभागीय अधिकारी जगदाळे , सहाय्यक विभागीय अधिकारी दाभाडे , स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन संभाजी शिंदे , सदस्य वामन पाटील ,सरपंच जाधव रणजीत,उपसरपंच शिंदे नितीन, ग्राहक पंचायतचे माळवदे प्रशांत,शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्य,पालक शिक्षक संघ माता पालक संघ,मुख्याध्यापक शिंदे कचरनाथ ज्ञानदेव ,
उपमुख्याध्यापिका मोरे प्रतिभा रमेशराव ,पर्यवेक्षक बेसिकराव गौरीशंकर पांडुरंग,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत विधाते यांनी केले तर आभार राहुल हातगिने यांनी मानले.


