पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील एल आय सी विमा प्रतिनिधी प्रशांत माळवदे यांच्या एल आय सी मधील उत्कृष्ट कामगिरी बद्दल शाखा प्रबंधक प्रमोद गुळवणी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उप प्रबंधक अश्विनी बिराजदार ,विकास अधिकारी बी एस चौगुले व कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी शाखा प्रबंधक प्रमोद गुळवणी म्हणाले की माळवदे यांनी एल आय सी विमा प्रतिनिधी म्हणून खूप सुंदर कामगिरी केली आहे.त्यांना पुणे विभागा अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल सन्मानित करण्यात आले आहे.त्याच्या पुढील कार्यास शुभेच्छा हि गुळवणी यांनी दिल्या.
यावेळी बी एस चौगुले म्हणाले की विमा प्रतिनिधी प्रशांत माळवदे यांनी त्यांच्या परिसरात खूप चांगली विमा सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.विमा हप्ता भरणे,वारस नोंद करणे,विमा हप्ता बदलणे, पॉलिसी वर कर्ज घेण्यासाठी मदत करणे, आदि कामे विमा ग्राहकांना मोफत सेवा देत आहेत. त्यामुळे एल आय सी विमा पॉलिसी प्रशांत माळवदे यांच्या कडे करण्यास ग्राहक पसंती देत आहेत. त्यामुळे माळवदे यांची चांगली कामगिरी होत आहे. यापुढे ही विमा ग्राहकांना सेवा देण्यासाठी मी शुभेच्छा देतो. असे ही चौगुले म्हणाले.
यावेळी एल आय सी विमा प्रतिनिधी प्रशांत माळवदे यांनी सर्वांचे आभार मानले.


