भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम प्रतिनिधी तेज न्यूज
मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांची राज्य स्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार साठी निवड झाल्याचे समृध्दी पर्यटन सांस्कृतिक सेवा विकास ट्रस्ट च्या संस्थापिका मिनाक्षी पाखरे यांनी भारत कवितके यांना निवड पत्र देऊन कळविले आहे.
सदर पुरस्कार भारत कवितके यांना १९ एप्रिल २०२६ रोजी मुंबई दादर येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सांज, शोधतो मी किनारा,अरे मी एकटा, आकाश तारकांचे, मी एक वृत्तपत्र लेखक, आयुष्य उसवताना,(आत्मकथन), माझ्या गावाच्या दिशेने.., मनातल्या चारोळ्या, आणि चांदण्यांना रोज सांगतो..अशी एकूण नऊ पुस्तके भारत कवितके यांची प्रकाशित झालेली असून १४ गाणी युट्यूबवर प्रसारित होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहेत, रसिकांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहेत, लवकरच त्यांचा लावणी संग्रह इष्कात रात रंगली हा प्रकाशित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनेक न्यूज चॅनल, आणि वर्तमानपत्रात भारत कवितके यांच्या बातम्या लेख कविता कथा चारोळ्या सातत्याने प्रसिद्ध होत असतात, महाराष्ट्र राज्यातील विविध संघटना, संस्था आणि मंडळ या वर भारत कवितके वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत, त्यांनी अनेक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आणि प्रमुख पाहुण्या चे स्थान भूषविले आहे,हा त्यांचा ११६९ वा पुरस्कार आहे, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून ही अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्यांच्या लावणी सध्या युट्यूबवर वर प्रचंड गाजत आहेत,भजन, लोकगीते, धनगर गीत, चरित्र गीत, भावगीत आदी प्रकारची गाणी युट्यूबवर प्रसारित झाली आहेत, त्यांच्या संघर्ष मय जीवनावरील त्यांचे आयुष्य उसवताना आत्मकथन सर्वत्र लोकप्रिय झाले आहे.
लेख स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक तर व्यसनमुक्ती काव्य लेखन स्पर्धेत राज्यात व्दितीय क्रमांक मिळाला आहे,तर अनेक ठिकाणी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले आहे, दादर येथील या कार्यक्रमात कवी संमेलन, कला सादरीकरण, आणि पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.शिवचरण मधुकर उज्जेणकर, उद्घाटक सचिन विमल मदनराव वायकुळे, प्रतिमा पूजन महेश महादेव पाखरे, अशोक मोहिते,सर्वेश पाटील, डॉ.उत्तमराव सोनवणे, प्रमुख मार्गदर्शक डॉ.रावसाहेब नाना घोडेराव प्रमुख उपस्थिती भावेश कोटंगळे, स्वागताध्यक्षा मिनाक्षी पाखरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.भारत कवितके यांचेवर या पुरस्कार निवडीमुळे अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

