सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला तालुक्यातील जवळा येथील सुप्रसिद्ध लोककलावंत शाहीर सुभाष गोरे यांना नालंदा विद्यापीठाच्या वतीने,पत्रकार भवन पुणे येथे लोककला क्षेत्रातील लोककला डॉक्टरेट मानद पदवीने सन्मानित करण्यात आली.
शाहीर सुभाष गोरे हे गेली 40 ते 45 वर्ष वर्षापासून लोककला जतन व संवर्धन केली आहे. गोंधळ, वाघ्या मुरळी, लावणी, तमाशा, शाहिरी, वासुदेव, अशा अनेक विविध लोककला त्यांना अवगत आहेत.लोककलेचे अभ्यासक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. लोककला जतन व संवर्धन करण्यात त्यांचे मोठे मोलाचे योगदान आहे. लोककला क्षेत्रात त्यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालय सचिवालय मुंबई विभागाचे,शाहिरी शिबिर, विविध कला महोत्सव,आदी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. वृद्ध कलावंत मानधन समिती सोलापूर सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
लोककला विधीनाट्य, तमाशा, शाहिरी आदी लोककलेचे व्याख्याते, शिक्षक, शिबिर संचालक म्हणून काम केले आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, मध्य प्रदेश, कर्नाटक, कोलकत्ता, दिव दमन, म्हैसूर, गुजरात, डेहराडून ,दिल्ली, आदी ठिकाणी शाहीर सुभाष गोरे यांनी लोककला सादर केली आहे, कलाभूषण, जीवनगौरव, कलारत्न, समाजरत्न, दादा कोंडके, साहित्यरत्न शाहीर आण्णाभाऊ साठे, आदर्श शाहीर पुरस्कार आदी पुरस्काराने शाहीर सुभाष गोरे सन्मानित आहेत, मराठी चित्रपटातही अनेक भूमिका साकारल्या आहेत.
मराठी सिने क्षेत्रातील आग्रण्य नाव सिने अभिनेते नागराज मंजुळे , यांचे सहकारी मित्र कलावंत डॉक्टर दीपक जाधव यांचे डॉक्टरेट पदवीसाठी मला मोलाचे मार्गदर्शन लाभले, टीम नालंदा फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक जाधव , नालंदा कर्तृत्व डॉक्टरेट पदवी गौरव सोहळ्यास अध्यक्ष, नितीन धनवे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष मराठी चित्रपट असोशियन, डॉक्टर नीता जोशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे अध्यक्ष मराठी अभ्यासक मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉक्टर, राजेंद्र सिंग वालिया ,माजी सैनिक भारतीय सेना, आर्या घारे, देऊळ बंद मराठी चित्रपट अभिनेत्री, आदी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरेट मानद पदवी सन्मान सोहळा पार पडला.
डॉक्टर शाहीर सुभाष गोरे यांना लोककला क्षेत्रातील डॉक्टरेट मानद पदवी प्राप्त झाल्याबद्दल राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, क्षेत्रातील मान्यवरांनी व कलावंतांनी दूरध्वनीवरून, प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या, संपूर्ण महाराष्ट्र, जिल्हा,तालुक्यातून शाहीर सुभाष गोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


