भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी येथील यशश्री अकॅडमी मधील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली. चि. स्वस्तिक सागर खाणे व कु. रचना पवन सातपुते या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन करत आपला नवोदय प्रवेश निश्चित केला. भाळवनी व पंचक्रोशी मध्ये सर्वत्र या विद्यार्थ्यांचे कौतुक होऊ लागले आहे.
या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी उमा महाविद्यालय पंढरपूर येथील माजी प्राध्यापक शशिकांत देशपांडे , निमगाव विद्यालय निमगाव ता. माळशिरस येथील माजी प्राचार्य भीमराव जाधव तसेच आदर्श इंद्रजीत विद्यालय महुद ता. सांगोला येथील प्राचार्य अभिमन्यू पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
अकॅडमीचे लोखंडे , प्रवीण लिंगडे तसेच इतर सर्व शिक्षक वृंद सर्वांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन देठे यांनी केले तर आभार भुसे यांनी मानले.

