पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या एच.एस.सी.परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे.
पंढरपूर शहर आणि तालुक्यातील शिस्तप्रिय आणि सर्वात मोठे केंद्र म्हणून नावलौकिक असणाऱ्या केंद्रातून यावर्षी एकुण 870 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत.20 दिवस चालणा-या परीक्षेस एकूण 33 विषयांची परीक्षा होणार आहे.परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता महाविद्यालयाने केली आहे.परीक्षा काळात कोणत्याही विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आलेले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जाधव बी.टी.यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक प्रा..काटकर व्ही.आर.व त्यांचे सहकारी महाराष्ट्र शासन,पुणे विभागीय मंडळ व रयत शिक्षण संस्था,सातारा यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन तणावमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
परीक्षा केंद्रावरती कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घेण्यात आली आहे अशी माहिती केंद्र संचालक प्रा.काटकर व्ही.आर.यांनी दिली.

