पंढरपूर प्रतिनिधी शिवकुमार भावलेकर तेज न्यूज
सर्व समाज बंधूना व समस्त नामदेव भक्तांना जय श्री नामदेव सर्व समाज बंधू भगिनींना व समस्त नामदेव भक्तांना सुचित करण्यात येते की दिनांक 12- 2- 2026 वार गुरुवार रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या स्मारकासाठी सरकार करून मंजूर झालेल्या जागेवर स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी स्थळ पाहणी होणार आहे.
स्थळ पाहणी च्या ठिकाणी जाणेपूर्वी सर्व समाज बांधवांनी सकाळी ठीक (१०) दहा वाजता श्री केशवराज संस्था नामदेव मंदिर पंढरपूर या ठिकाणी एकत्र यायचे आहे सर्वप्रथम सकाळी 10 ते 11 या वेळेत आपली मिटींग होईल. त्यानंतर साडेअकरा ते साडेबारा या वेळी स्थळ पाहणी होईल.
स्थळपाहणी करून परत नामदेव मंदिर या ठिकाणी येऊन सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा या स्थळ पाहणी करिता उपविभागीय अधिकारी पंढरपूर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नगर पालिका मुख्याधिकारी तसेच प्रकल्प सल्लागार हे पंढरपूर या ठिकाणी येत असून आपण देखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
स्थळ -(भक्ती सागर) चंद्रभागा नदीच्या पलीकडे 65 एकर क्षेत्र लगत पंढरपूर येथे होणार आहे.अशी माहिती श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघ महाराष्ट्र नामदेव समाजोन्नती परिषद,श्री केशवराज संस्था पंढरपूर श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्या वतीने देण्यात आली आहे.

