पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
विक्रम राजाराम नाईकनवरे यांनी पत्रकारिता मध्ये पदवी प्राप्त केली आहे.हा कोर्स मध्ये त्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. शिक्षणाचे माध्यम मराठी ठेवून त्यानी माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रातील मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३१ वा दीक्षित समारंभात सुमारे १ लाख २४ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली .या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आतिरिक्त मुख्य सचिव डॉ. निर्मलजीत सिंह कलसी उपस्थित होते.
तसेच विघापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
ही पदवी प्राप्त केल्याबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक करून अभिनंदन केले. तसेच तेज न्यूज परिवारा कडून ही अभिनंदन केले आहे.

