पंढरपूर प्रतिनिधी शिवकुमार भावलेकर
तिर्थक्षेत्र पंढरी नगरीत चंद्रभागा नदीच्या तिरावर असणार्या 65 एकर परिसरात उभारण्यात येणार्या बहुचर्चित व सुमारे 12 वर्षापासून प्रलंबित असलेल्या संत नामदेव महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम लवकरच सुरु होणार आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली गतीमान झाल्या असून येत्या दोन महिन्यात स्मारक उभारणीच्या कामाचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. महेश ढवळे यांनी दिली.
गुरुवार दि. 12 फेब्रुवारी शासकीय अधिकारी, आर्किटेक्ट यांच्या समवेत स्मारकाच्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, शासकीय विभागाचे अधिकारी, श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज, मुकुंद महाराज, एकनाथ महाराज, भावार्थ महाराज, अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ, नामदेव समाजोन्नती परिषदचे पदाधिकारी व शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड. महेश ढवळे म्हणाले, वारकरी संप्रदायाचे आद्यप्रवर्तक, श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे पंढरी नगरीत भव्य असे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी राज्य शासनाने 90 कोटी रुपये मंजूर केले. संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी चंद्रभागा नदीच्या पलीकडे भक्तीसागर येथे रेल्वे विभागाची जागा राज्य शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून याठिकाणी 10 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्मारकाचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत सोलापूर, पुणे व मुंबई येथे मंत्री, अधिकार्यांसमवेत अनेक बैठका पार पडल्या. याबाबत अनेक समस्या निर्माण होत होत्या. अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ व नामदेव समाजोन्नती परिषद व श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.
श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, पालखीतळ मार्ग तीर्थक्षेत्र विकास आराखडयाच्या अंतर्गत विभागीय आयुक्त, पुणे यांनी आराखड्यातील मंजूर कामांकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पॅनल गठीत केला आहे. सदर पॅनलमध्ये पुणे येथील क्रिएशन इंजिनिअर कंपनीचा समावेश आहे. नियोजन विभागाच्या दि.12 सप्टेंबर 2014 च्या शासन निर्णयानुसार श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखीतळ-मार्ग विकास आराखड्याच्या अंतर्गत संत नामदेव महाराज स्मारकाचे काम काम मंजूर आहे. सदर स्मारक उभारण्यासाठी या कंपनीची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर स्मारकाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी, पंढरपूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर, न.पा. मुख्याधिकारी यांच्यासमवेत स्थळपाहणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेकरिता कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर यांच्याकडे सादर करावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. सदर पत्राच्या प्रती विभागीय आयुक्त, पुणे, विशेष कार्य अधिकारी (तीक्षेवि), उपविभागीय अधिकारी, पंढरपूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर, मुख्याधिकारी न. प. पंढरपूर यांना देण्यात आल्या आहेत.
सदर पाहणी दौर्याप्रसंगी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे यांनी जागेसंदर्भात तर आर्किटेक्ट काळभैरव यांनी स्मारक उभारणीच्या कामाची माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष नंदकुमार कोसतवार, धनंजय गोंदकर, विश्वस्त, हर्ष कपडेकर, अनिल गचके, वर्धा, एकसंघाचे प्रदेशाध्यक्ष व संत नामदेव महाराज शिंपी समाजाचे पंढरपूर अध्यक्ष गणेश उंडाळे, सचिव विलास पोरे, विश्वस्त बाबासाहेब महिंद्रकर, राजेश धोकटे , अनिल निकते, पुरुषोत्तम निकते, राहुल महाडिक, जयवंत कांबळे, श्री संत नामदेव शिंपी समाजाचे युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश धट, दत्तात्रय चांडोले, अक्षय महिंद्रकर, आप्पासाहेब बंगाळे, भरत चांडोले, अनिल धट,गणेश महिंद्रकर, शिवकुमार भावलेकर, निलेश धोकटे, राजेंद्र निकते, दत्तात्रय निपाणकर, सतीश निपाणकर, संजय निपाणकर, सचिन बुरांडे, देविदास बोधे, रत्नाकर पिसे, संतोष पतंगे, प्रसाद निकते, कृष्णा चांडोले, माऊली निकते, प्रशांत काकडे, नाना जवंजाळ, बुलबुले, गणेश पतंगे, अक्षय जवंजाळ, कृष्णा जवंजाळ, गजानन खटावकर, गजानन जवंजाळ, सचिन केकडे, नासपचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील पोरे, अशोक खैरनार, मुंबई, अक्षदा विवाह संस्थेचे संस्थापक, महेश मांढरे, नासपचे जेष्ठ विश्वस्त वसंतराव खुर्द, राजन उरणकर, नासपचे सांगली जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष बाळासाहेब काकडे कोषाध्यक्ष राजाभाऊ पोरे हडपसर विभाग उपाध्यक्ष अक्षय मांढरे, प्रमोद शिंपी, जळगाव, आर्किटेक्ट काळभैरव, पुणे कॅम्प अध्यक्ष प्रदीप खोले, महाराष्ट्र युवती अध्यक्षापूजा वादवणे, सहाय्यक वैभव सदावर्ते, पुणे जिल्हाध्यक्ष अॅड. सागर मांढरे, आदी समाज बांधव उपस्थित होते.

