पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महावितरणतर्फे जिल्ह्यातील सर्व विभागीय कार्यालयांमध्ये दि १८ फेब्रुवारी रोजी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले असल्याची माहिती अ.भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
वीज ग्राहकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी निवारण्यासाठी महावितरणतर्फे दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी आयोजन करण्यात येते त्याप्रमाणे १८ रोजी "ग्राहक तक्रार निवारण दिनाचे" आयोजन करण्यात आले आहे तरी १८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी,अकलूज, सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण अशा सर्व विभागीय कार्यालयांमध्ये सकाळी ११ ते दुपारी १ वा.पर्यंत ग्राहकांनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडून त्यांची सोडवणूक करून घ्यावी.
यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंता, सहा.अभियंता हे अधिकारी समक्ष उपस्थित राहून तक्रारी,अडचणी,समस्या सोडविणार आहेत.
तरी पंढरपूर, बार्शी,अकलूज,सोलापूर ग्रामीण,सोलापूर शहर या ठिकाणी सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांनी आपल्या अवाजवी बील,सरासरी बील आकारणी, वीज बिल वेळेत न मिळणे,मीटर रीडिंग वेळेत न घेणे,कनेक्शन वेळेत न मिळणे,योग्य दाबाने वीजपुरवठा न होणे,वारंवार वीजपुरवठा खंडित होणे,नविन मीटर वेळेत न मिळाल्यामुळे ग्राहकांना शेतकरी ग्राहकांना वेळेत डी.पी.बदलून न मिळणे, सोलर सिस्टीम अशा कोणत्याही स्वरुपातील लिखित तक्रार अर्जासह उपस्थित राहावे असे आवाहन महावितरण सोलापूर मंडलचे अधिक्षक अभियंता सुनिल माने,अ.भा.ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल,सदस्य विनोद भरते,सुभाष सरदेशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये,जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा महिला प्रमुख सौ.माधुरी परदेशी,जिल्हा कोषाध्यक्ष सौ.ललिता वांगडे,जिल्हा सदस्य पांडुरंग अल्लापूरकर,अण्णा ऐतवाडकर,जिल्हा मध्यस्थता कक्षाचे सदस्य संभाजी लंगोटे यांनी केले आहे.

