सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टीन सिटीची नुकतीच बोर्ड मीटिंग आणि जनरल मिटींग आयोजित करण्यात आली होती.
त्यांमध्ये सन २६/२७ सालासाठी नुतन पदाधिकारी निवडण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून लायन सातलिंग शटगार, सचिव म्हणून लायन सोमशेखर भोगडे, खजिनदार म्हणून लायन नागेश बुगडे, प्रथम उपाध्यक्ष म्हणून लायन संतोष जाधव, अन्य पदाधिकारी निवड करण्यात आली.यावेळी लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टीन सिटीचे अध्यक्ष डॉ कॄष्णा राहुल चंडक, सचिवा लायन नंदिनी जाधव, खजिनदार प्रभाकर जवळकर, झोन चेअरमन लायन सोमशेखर भोगडे, माजी प्रांतपाल एम.जे एफ लायन ममता बुगडे,एम जे एफ डॉ नारायणदास चंडक, एम जे एफ लायन डॉ राहुल चंडक, लायन मुकुंद जाधव,इंजि. सागर पुकाळे, अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


