पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील प्रभाग क्रमांक ५ मधून नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल ओंकार जोशी आणि कुसुम परचंडे यांचा सत्कार सोहळा नुकताच संतश्रेष्ठ सद्गुरु कृष्णाजी महाराज मठ गोविंदपुरा पंढरपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. ॲड. संदिप कागदे मित्रपरिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही नूतन नगरसेवकांचा हार, शाल, सद्गुरु कृष्णाजी महाराज यांचा फोटो आणि गुलाबाचे रोप देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संरक्षण समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार नागेश काळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना नूतन नगरसेवक ओंकार जोशी आणि कुसुम परचंडे यांनी मतदारांचे आभार मानले. "प्रभागातील नागरिकांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवू आणि येणाऱ्या काळात उत्कृष्ट विकासकामे करून दाखवू," असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रीती वाघ यांनी केले.या कार्यक्रमाला श्रीराम गणपुले, महेश कुलकर्णी व ओंकार विरधे यांची खंबीर साथ ही लाभली.
या सोहळ्याप्रसंगी गौरव कुलकर्णी, रेणुका कुलकर्णी, माधवी डोळे, दिलीप खिस्ते, सुनील महाराज खिस्ते, वसुधा खिस्ते, सुरेखा खिस्ते, किशोर खिस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना नूतन लोकप्रतिनिधींकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यांच्या कामाबद्दलचा विश्वास बोलून दाखवला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड. संदिप कागदे यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने करण्यात आली. ॲड. संदिप कागदे मित्र परिवाराच्यावतीने या सोहळ्याचे उत्तम नियोजन केले होते.

