पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित “माझी वसुंधरा अभियान” पुरस्कार सोहळा आज मुंबई येथे अत्यंत सन्मानपूर्वक पार पडला.
या अभियानांतर्गत 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या गटामध्ये आपल्या पंढरपूर नगरपरिषदेस राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
हा पुरस्कार म्हणजे केवळ एक सन्मान नसून, स्वच्छता, हरित क्षेत्र वाढ, पर्यावरणपूरक उपक्रम, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि शाश्वत विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची पावती आहे. पंढरपूर शहराने पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उचललेली प्रत्येक पायरी राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या गौरव सोहळ्याला महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने हा सन्मान नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणिताताई भगीरथ भालके, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, मुख्याधिकारी महेश रोकडे, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.


