अकलूज प्रतिनिधी संजय निंबाळकर तेज न्यूज
माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथे शिव - कीर्ती युवा मंच शाखा कोळेगाव यांच्यावतीने अकलूज नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळा कोळेगाव या ठिकाणी खाऊ वाटप करून बाबांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमासाठी शिवसृष्टी मल्टीमीडिया लेझर शोचे संचालक धनंजय (भाऊ) दुपडे, व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन सावंत पाटील उपस्थित होते.
यावेळी नितीन सावंत हे शिव बाबांच्या कार्यावर बोलताना म्हणाले की सामाजिक, शैक्षणिक ,आणि उद्योग क्षेत्रात चांगले काम करणारे नेतृत्व म्हणजे शिवबाबा त्यांनी कमी वयामध्ये अनेक संस्थांवर काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करताना त्यांनी अकलूज नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पर्यंत चांगलं काम केलं आहे. त्यावेळी सावंत साहेबांनी शिव बाबांना पुढील वाटचालीसाठी उदंड आयुष्य व अनंत शुभेच्छा दिल्या.
यावेळी या कार्यक्रमासाठी पिलीव गावचे युवक सोहेल बागवान तसेच शिवकीर्ती युवा मंच शाखा कोळेगावचे अध्यक्ष सुभाष बंदपट्टे, दत्तात्रय गेजगे, रानोबा पारसे, संतोष धांडोरे शाळेमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कोळेगाव मधील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.


