पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ उद्यान,पंढरपूर येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक/अध्यक्ष माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत , प्रमुख पाहुणे तहसीलदार सचिन लंगोटे , न. पा. पंढरपूर मुख्याधिकारी महेश रोकडे , मा. उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले, किरण आप्पा भोसले, युवा सेना अध्यक्ष विश्वजीत भोसले व जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज भोसले उपस्थित होते.
सदर यास चित्रकला,रंगभरण स्पर्धेसाठी शहरातील १ ली ते ४ थी रंग भरण तसेच चित्रकला स्पर्धेत ५ वी ते ७ वी गटात १२०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.दत्तात्रय सावंत सर म्हणाले " मुलांनी मोबाईल पासून दूर राहण्यासाठी मैदानी स्पर्धा त्याचबरोबर कलाविष्कार यात सहभाग घेऊन यशस्वी व्हावे. " मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले " लहान मुलांनी सुंदर चित्र रंगभरण काम केल्याबद्दल खूप आनंद वाटत आहे. मन उत्साही ठेवण्यासाठी पुस्तक वाचन, संगीत, चित्रकला हे गुण स्वीकारल्यास जीवनात निरसता येणार नाही व जीवन उत्साही,आनंदी होईल ".
या स्पर्धेत सहभागी झालेल्या १२०० विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र, बिस्कीट पुडे देण्यात आले. सदर चित्रकला, रंगभरन स्पर्धेचे परीक्षण कला मंचाचे सदस्य अमित वाडेकर , रमेश देवमारे व पांडुरंग शिंदे यांनी केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वंभर पाटील ( जिल्हाध्यक्ष कर सल्लागार संघटना ), शैलेश भोसले, युवा सेना अध्यक्ष विश्वजीत भोसले व मान्यवर परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस प्रथम,द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ तीन नंबर काढण्यात आले. बक्षीस म्हणून चित्रकलेचे साहित्य,रंगीत खडू पेटी, पॅड ट्रॉफी ( सन्मानचिन्ह ) प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशिनाथ गोगाव , चंद्रकांत देसाई , राजेंद्र ढवळे ,सुहास मासाळ ,सतिश चंद्रराव , पंकज गुरमे , तुकाराम खंडाडे व समिती अध्यक्ष महेश भोसले यांनी परिश्रम घेतले.


