भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्नमंजुषा स्पर्धा बुधवार दिनांक 11.02.2026 रोजी संपन्न झाल्या.या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल भाळवणीच्या विद्यार्थिनींनी मध्य विभागातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनि सहभाग घेतला होता.
1. कु.घोगरे कृतिका दत्तात्रय
2. कु.शेख सिमरन अझरुद्दीन
3. कु. हातगिने श्रेया राहुल
सदर विद्यार्थिनींचे व प्रश्नमंजुषा विभाग प्रमुख शिक्षक नारनवर व शिक्षिका यू व्ही नागटिळक , गुरुकुल विभाग प्रमुख शिक्षक रणजीत दडस तसेच या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व विद्यालयाचे प्राचार्य के.डी.शिंदे , उपमुख्याध्यापिका श्रीम.मोरे पर्यवेक्षक बेसिकराव व सर्व सेवक वर्ग यांचे अभिनंदन केले.

