कणकवली प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
कला, नृत्य, रिॲलिटी शो, वकृत्व,बाल नाट्य अशा सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात लहान वयातच उंच भरारी घेणारी कासार्डे हायस्कूल,ता.कणकवली.येथे६ वी इयत्तेत शिकणारी संरक्षण मंत्रालयाकडून आपल्या दैदिप्यमान कामगिरीवर संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र स्विकारणारी सिंधुदुर्ग कन्या कु.सावी वैभव मुद्राळे हिचा आगळावेगळा सत्कार जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने विशेष सन्मानपत्र प्रदान करुन उत्साहात साजरा करण्यात आला.
हा सत्कार समारंभ कु.सावी मुद्राळे यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवर व मुद्राळे कुटुंबीयांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत मुद्राळे कुटुंबीयांनी हास्यवदनाने, उत्कृष्ट मालवणी मराठमोळ्या पद्धतीने केले.जनजागृती संस्था खूप आभारी आहे.याप्रसंगी उद्योजक, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रविण शेठ लोकरे, देवांग कोष्टी समाज सहकारी पतपेढी मुंबई चे उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ कणकवली चे कार्यकारिणी सदस्य श्री. सत्यवान धुमाळे, वेतोबा सिरियल फेम गाव मामी,गाव गाता गजाली फेम सिने-नाट्य अभिनेत्री सिंधुदुर्ग ग्लोबल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.अक्षता ताई कांबळी, अक्षरोत्सव प्रमुख, संदेश पत्र संग्राहक,दै.लोकमतचे पत्रकार श्री.निकेत पावसकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रख्यात चित्रकार, निसर्ग प्रेमी,प्राणी मित्र, समाजसेवक श्री.अक्षय मेस्त्री, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री.भाऊ राणे, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री.विजय देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
या सर्वांच्या उपस्थितीत जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने कु.सावी वैभव मुद्राळे हिला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, संस्था कार्यअहवाल, भगवद्गगीता व विशेष आकर्षक सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले.सन्मानपत्राचे वाचन संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी केले.सर्वच प्रमुख अतिथी व मान्यवरांनी कु.सावीच्या या उज्वल यशाबद्दल भरभरून कौतुक व अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.अनिल कांबळी,सौ.अक्षता कांबळी,सौ.गंधाली तिरपणकर यांचे सहकार्य लाभले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे खजिनदार श्री.दत्ता कडुलकर यांनी विशेष मेहनत घेतली.शेवटी जनजागृती सेवा संस्थेने मुंबई वरुन आपल्या निवासस्थानी येऊन कु.सावीचा सत्कार केला त्याबद्दल मुद्राळे कुटुंबीयांनी सर्वांचे विशेष आभार मानले.

