मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची मोहोळ तालुक्याची कार्यकारणी सोलापूर जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. तसेच सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
व्हॉईस ऑफ मीडियाच्या नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये पद्माकर सोनटक्के(शहराध्यक्ष), सचिन दळवी (उपाध्यक्ष), नानासाहेब ननवरे (सचिव), तेजस तिकुटे (खजिनदार), सुहास परदेशी (प्रसिद्धी प्रमुख), राहुल सोनवणे(सहसचिव), सचिन गवळी (संघटक) यांची निवड करण्यात आली.
यावेळी मंगळवेढा तालुकाध्यक्ष रोहिदास भोरकडे तसेच जिल्हा कोर कमिटी सदस्य तथा पंढरपूर खजिनदार समाधान वनसाळे तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलास रणदिवे, बालाजी शेळके, मोहोळ तालुकाध्यक्ष विजय पुजारी, तालुका कार्यकारिणी सदस्य भैय्यासाहेब कांबळे, दत्ता मिसाळ, दिनेश सातपुते, अशोक कांबळे, दत्तात्रय पांढरे, गोरक्ष गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व मान्यवरांनी विविध विषयावर सखोल चर्चा करत सर्व पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले.


