माढा प्रतिनिधी तेज न्यूज
शुक्रवारी माढा शहरात महाराष्ट्राचा दादा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शोकसभेचं अयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेत अजितदादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी अजितदादाच्या कार्याचा गौरव केला. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता; वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले.
दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते. म्हणून अजूनही असं वाटतंय दादा आपल्यातच आहेत त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाहीये.महाराष्ट्रासह, पक्षाची, माझ्या माढा मतदारसंघाची आणि माझी कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे. असे मत आमदार अभिजित आबा पाटील यांनी व्यक्त केले.

